Posts

एवढे लक्षात ठेवा : कवी विंदा करंदीकर

एवढे लक्षात ठेवा : कवी विंदा करंदीकर  उंची न आपुली वाढते , फारशी वाटून हेवा । श्रेय ज्याचे त्यास द्यावे , एवढे लक्षात ठेवा  ।। ती पूर्वजांची थोरवी , त्या पूर्वजांना गौरवी । ती न कामी आपुल्या , एवढे लक्षात ठेवा ।। जाणते जे संगती , ते एकूण घ्यावे सदा । मात्र ती हि माणसे , एवढे लक्षात ठेवा ।। चिंता जगी या सर्वथा , कोना न येई टाळता । उद्योग चिंता घालावी , एवढे लक्षात ठेवा ।। विश्वास ठेवावाच लागे , व्यवहार चाले त्यावरी । सीमा तयाला पाहजे , एवढे लक्षात ठेवा ।। दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले । तोच गुरुचे पांग फेडी, एवढे लक्षात ठेवा ।। माणसाला शोभणारे , युद्ध एकच या जागी । त्याने स्वतःला जिंकले , एवढे लक्षात ठेवा ।।  

जगण आपल राहून गेल || कविता || कवी विशाल मोहिते || Jagan Aapal Rahun Gel

नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांनाच माहित आहे,  आपल्या भूतकाळाची आत्मग्लानी भूतकाळ मिटवू शकत नाही ,आणि भविष्याची चिंता काही भविष्य बदलू शकत नाही.  परंतु या दोन्ही मध्ये, जे आज हाती असलेले क्षण, जे  जीवन आहे.  ते मात्र यात आपण जगायचे राहून जातो.  या जीवनावर आधारित मला आवडलेली कवी विशाल मोहिते यांची   " जगण आपल राहून गेल " हि कविता मी तुमच्यासाठी या पोस्ट मध्ये घेऊन आलो आहे. कवितेच नाव " जगण आपल राहून गेल " " डोळ्यात दाटून भावना, सारे मलाच पाहत होते..   कितीतरी ओळखी अनोळखी, चेहेरे आज त्यात होते.. कधी नव्हे ते आज सार, गाव मला पाहून गेल..    मरता मरता सहज कळाल, जगण आपल राहून गेल..   आयुष्यात नागमोडी वळणांना, मी खूपदा पाहील होत..  जे क्षण होते निसटले, त्यांना जगण राहील होत..  श्वासात शेवटच्या डोळ्यां समोरून, जीवन सार धावून गेल.. मरता मरता सहज कळाल, जगण आपल राहून गेल.. घरच्यांची स्वप्ने आज सारी, एकदम होती चूर झाली..  रडतांना म्हणाल कोणीतरी, नियती किती क्रूर झाली.. माझ त्यांच्यातून जाण, घरच्यांना घोर लावून गेल.. मरता मरत...

त्याला तयारी पाहिजे || कवी विंदा करंदीकर || Tyala Tayari Pahije poem by poet Vinda Karandikar

Image
आपण नेहमी ऐकत आलो आहोत कि सत्य हे नेहमी कडू लागत. परंतु ते मधातून देण्याची कला, मात्र फार थोड्या लोकांकडे असते. याची प्रचिती तुम्हाला कवी विंदा करंदीकर यांची " त्याला तयारी पाहिजे " हि कविता एकूण नक्की येईल.   " अग्नीमुळे प्रगती घडे, हे अन्नही त्याने शिजे. चटका बसे केंव्हातरी, त्याला तयारी पाहिजे. पुष्पे, फळे नि सावली, वृक्षातळी या गावली. काटा अभावीत बोचता, त्याला तयारी पाहिजे. आपुल्या चुका ना आपणा, इतरांस त्या दिसती परी. त्याचीच चर्च्या व्हायची, त्याला तयारी पाहिजे. केले कुणास्तव ते किती, हे कधी मोजूनये, होणार त्याची विस्मृती, त्याला तयारी पाहिजे. डोक्यावरी जे घेऊनी, आज येथे नाचती. घेतील ते पायातळी, त्याला तयारी पाहिजे. सत्यास साक्षी ठेवुनी, वागेल जो, बोलेल जो, तो बोचतो मित्रांसही , त्याला तयारी पाहिजे. पाण्यामध्ये पडलास ना ? पाणी कसेही ते असो. आता टळेना पोहणे, त्याला तयारी पाहिजे . सुखात सर्व सोबती, दुःखात ना कोणती. समोर जाण्या एकटा, त्याला तयारी पाहिजे. तोंडावर गोड जे बोलती, पाठीमागे निंदा करिती. तोंड देण्या निंदकास, त्याला तयारी पाहिजे.         ...

कवी सुरेश भट यांची " विझलो आज जरी मी " हि कविता || poet Suresh Bhat's " wizalo aaj jari mi " poem

Image
प्रत्येकजण आपल्या आयुष्यात निराश किंवा अपयशी कधीना कधी होतो. कोणी परत त्या निराशेतुन किंवा अपयशातून बाहेर पडून परत नव्याने लढाई सुरू करण्याचे सामर्थ्य ठेवतो. तर कुणी हार मानून प्रयन्त सोडून देतो. कोणी अगदी टोकाचा निर्णय घेऊन स्वतःचे आयुष्य संपवतो. परंतु जो स्वतःशी सकारात्मक बोलवतो तो जीवनातल्या कोणत्याही संकटाशी सामना करण्यासाठी परत सज्ज होतो. अशीच स्वतःला बळ देणारी, संकटावर मात करण्याचे सामर्थ्य देणारी कवी सुरेश भट यांची विझलो आज जरी मी हि कविता. " विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही... पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही... छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही... माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे... जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही... रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर... डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही... येतील वादळे, खेटेल तुफान तरी वाट चालतो... अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही... " "" कविता आवडली असल्यास इतराना पण पाठवा...     धन्यवाद ! ""

जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाची मनोरंजक माहिती || Interesting information about largest bird on earth

Image
आपल्या सर्वांना माहित असेल कि जगातला सर्वात मोठा पक्षी म्हणून शहामृग या पक्षाला ओळखले जाते. खरेतर जगात शहामृगा पेक्षाही मोठे पक्षी होते परंतु कालांतराने ते नष्ठ झाले. हा जगातला सर्वात मोठा पक्षी आहेच परंतु या पक्षाच्या आणखीन काही मजेशीर माहिती तुम्हाला माहित असायला पाहिजे. १. शहामृग हा जगातला सर्वात वजनदार आणि सर्वात मोठा पक्षी आहे, त्याची उंची ९ फूट पर्यंत आणि वजन १४५ किलोग्रॅम पर्यंत असते. २. शहामृगाचे डोळे हे त्याच्या मेंदूपेक्षाही मोठे असतात आणि त्याचे डोळे हे जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांपेक्षा सर्वात मोठे आहेत. ते सुमारे ५ सेंटीमीटर असते. ३. शहामृग हा पृथ्वीवरील सर्वात मोठे अंडे देणारा पक्षी आहेत. ते १५ सेंटीमीटर लांब आणि १.५ किलो वजनाचे असते. ४. शहामृग हा पक्षी असून तो त्याच्या पंखाने उडू शकत नाही, परंतु तो त्याच्या दोन पायाने ७० किलोमीटर प्रति तास वेगाने पळू शकतो. शहामृगाचे पंख उडण्यासाठी नसून जमिनीवर पाळताना दिशा बदलण्यासाठी तो वापरतो. ५. सहामृगाला ३ पोट असतात. ६. शहामृग त्याचे अन्न बारीक करण्यासाठी तो गारगोटी आणि छोटे दगड खातो आणि त्याच्या मदतीने तो पोटातील अन्न बारीक करतो. ...

मराठी सुविचार | marathi suvichar

Image
 

कवी विंदा करंदीकर यांची "आयुष्याला द्यावे उत्तर" हि कविता || poet Vinda Karandikar's "Aaushyala dyave uttar " poem

Image
कवी गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर  यांची " आयुष्याला द्यावे उत्तर " हि कविता खूप काही शिकवून जाते. हि कविता आयुष्यातील संकटांशी  लढण्याचे बळ देते, तसेच स्वप्न पाहायला शिकवते असे बरेचशे उद्देश विंदा करंदीकरांनी या कवितेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कवी विंदा करंदीकर  " असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावुन अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर... नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची... असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर... पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती, काळीज काढुन देताना... संकटासही ठणकावुन सांगावे, आता ये बेहत्तर,  नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर... करून जावे असेही काही, दुनियेतुनी या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना... स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर..." "" कविता...