कवी सुरेश भट यांची " विझलो आज जरी मी " हि कविता || poet Suresh Bhat's " wizalo aaj jari mi " poem
प्रत्येकजण आपल्या आयुष्यात निराश किंवा अपयशी कधीना कधी होतो. कोणी परत त्या निराशेतुन किंवा अपयशातून बाहेर पडून परत नव्याने लढाई सुरू करण्याचे सामर्थ्य ठेवतो. तर कुणी हार मानून प्रयन्त सोडून देतो. कोणी अगदी टोकाचा निर्णय घेऊन स्वतःचे आयुष्य संपवतो.
परंतु जो स्वतःशी सकारात्मक बोलवतो तो जीवनातल्या कोणत्याही संकटाशी सामना करण्यासाठी परत सज्ज होतो. अशीच स्वतःला बळ देणारी, संकटावर मात करण्याचे सामर्थ्य देणारी कवी सुरेश भट यांची विझलो आज जरी मी हि कविता.
" विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही...
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही...
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजून अशी भिंत नाही...
माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे...
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही...
रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर...
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही...
येतील वादळे, खेटेल तुफान
तरी वाट चालतो...
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही..."
"" कविता आवडली असल्यास इतराना पण पाठवा... धन्यवाद ! ""
ही कविता कोणत्या कविता संग्रहातील आहे?
ReplyDelete