जगण आपल राहून गेल || कविता || कवी विशाल मोहिते || Jagan Aapal Rahun Gel

नमस्कार मंडळी,

आपल्या सर्वांनाच माहित आहे,  आपल्या भूतकाळाची आत्मग्लानी भूतकाळ मिटवू शकत नाही ,आणि भविष्याची चिंता काही भविष्य बदलू शकत नाही. 

परंतु या दोन्ही मध्ये, जे आज हाती असलेले क्षण, जे  जीवन आहे.  ते मात्र यात आपण जगायचे राहून जातो. 

या जीवनावर आधारित मला आवडलेली कवी विशाल मोहिते यांची   "जगण आपल राहून गेल " हि कविता मी तुमच्यासाठी या पोस्ट मध्ये घेऊन आलो आहे.

कवितेच नाव "जगण आपल राहून गेल "

"डोळ्यात दाटून भावना, सारे मलाच पाहत होते..  
कितीतरी ओळखी अनोळखी, चेहेरे आज त्यात होते..

कधी नव्हे ते आज सार, गाव मला पाहून गेल.. 
 मरता मरता सहज कळाल, जगण आपल राहून गेल..
 
आयुष्यात नागमोडी वळणांना, मी खूपदा पाहील होत.. 
जे क्षण होते निसटले, त्यांना जगण राहील होत.. 

श्वासात शेवटच्या डोळ्यां समोरून, जीवन सार धावून गेल..
मरता मरता सहज कळाल, जगण आपल राहून गेल..

घरच्यांची स्वप्ने आज सारी, एकदम होती चूर झाली.. 
रडतांना म्हणाल कोणीतरी, नियती किती क्रूर झाली..

माझ त्यांच्यातून जाण, घरच्यांना घोर लावून गेल..
मरता मरता सहज कळाल, जगण आपल राहून गेल..

लोकांतला खोटा मान सन्मान, यांना मी माझा म्हणालो.. 
आयुष्यभर अपेक्षांचे, ओझेच फक्त वाहत आलो..

शेवटी खांदे बदलत बदलत लोकांनी, माझ प्रेत श्मशानी वाहून नेल..
जळता जळता ही परत आठवल, जगण आपल राहून गेल.."


कवितेच्या शेवटी एवढंच सांगावस वाटत, आपल्या प्रत्येकाचे आयुष्य खूप सुंदर आहे त्याची तुलना परीक्षेत पडलेल्या गुणांशी, आपल्याला मिळणाऱ्या पगाराशी किंवा इतरांच्या आयुष्याशी कधीच करू नका ... जर तुम्ही जिवंत असाल तर कोणतीही गोष्ट तुम्ही एक किंवा अनेक प्रयत्न करून ती मिळवूच शकता.. 
  
कविता आवडल्यास इतरांना पण पाठवा ...         धन्यवाद !




Comments

Popular posts from this blog

कवी सुरेश भट यांची " विझलो आज जरी मी " हि कविता || poet Suresh Bhat's " wizalo aaj jari mi " poem

कवी विंदा करंदीकर यांची "आयुष्याला द्यावे उत्तर" हि कविता || poet Vinda Karandikar's "Aaushyala dyave uttar " poem

त्याला तयारी पाहिजे || कवी विंदा करंदीकर || Tyala Tayari Pahije poem by poet Vinda Karandikar