जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाची मनोरंजक माहिती || Interesting information about largest bird on earth
आपल्या सर्वांना माहित असेल कि जगातला सर्वात मोठा पक्षी म्हणून शहामृग या पक्षाला ओळखले जाते. खरेतर जगात शहामृगा पेक्षाही मोठे पक्षी होते परंतु कालांतराने ते नष्ठ झाले. हा जगातला सर्वात मोठा पक्षी आहेच परंतु या पक्षाच्या आणखीन काही मजेशीर माहिती तुम्हाला माहित असायला पाहिजे.
१. शहामृग हा जगातला सर्वात वजनदार आणि सर्वात मोठा पक्षी आहे, त्याची उंची ९ फूट पर्यंत आणि वजन १४५ किलोग्रॅम पर्यंत असते.
२. शहामृगाचे डोळे हे त्याच्या मेंदूपेक्षाही मोठे असतात आणि त्याचे डोळे हे जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांपेक्षा सर्वात मोठे आहेत. ते सुमारे ५ सेंटीमीटर असते.
३. शहामृग हा पृथ्वीवरील सर्वात मोठे अंडे देणारा पक्षी आहेत. ते १५ सेंटीमीटर लांब आणि १.५ किलो वजनाचे असते.
४. शहामृग हा पक्षी असून तो त्याच्या पंखाने उडू शकत नाही, परंतु तो त्याच्या दोन पायाने ७० किलोमीटर प्रति तास वेगाने पळू शकतो.
शहामृगाचे पंख उडण्यासाठी नसून जमिनीवर पाळताना दिशा बदलण्यासाठी तो वापरतो.
शहामृगाचे पंख उडण्यासाठी नसून जमिनीवर पाळताना दिशा बदलण्यासाठी तो वापरतो.
५. सहामृगाला ३ पोट असतात.
६. शहामृग त्याचे अन्न बारीक करण्यासाठी तो गारगोटी आणि छोटे दगड खातो आणि त्याच्या मदतीने तो पोटातील अन्न बारीक करतो. पूर्ण वाढ झालेल्या शहामृगाच्या पोटात १ किलो पर्यंत गारगोट्या व छोटी दगड असतात. तीन पोटापेकी व्हेंट्रीक्युलस या पोटात तो गारगोट्या व छोटी दगड अन्न बारीक करण्यासाठी ठेवतो.
७. शहामृगाचे पाय खूप मजबूत असतात, त्याच्या लाताच्या तडाख्यात सिंह सुद्धा मरतो.
"" माहिती आवडल्यास इतरांना पण पाठवा .... धन्यवाद ! ""
Comments
Post a Comment