एवढे लक्षात ठेवा : कवी विंदा करंदीकर

एवढे लक्षात ठेवा : कवी विंदा करंदीकर 

उंची न आपुली वाढते , फारशी वाटून हेवा ।

श्रेय ज्याचे त्यास द्यावे , एवढे लक्षात ठेवा  ।।

ती पूर्वजांची थोरवी , त्या पूर्वजांना गौरवी ।

ती न कामी आपुल्या , एवढे लक्षात ठेवा ।।

जाणते जे संगती , ते एकूण घ्यावे सदा ।

मात्र ती हि माणसे , एवढे लक्षात ठेवा ।।

चिंता जगी या सर्वथा , कोना न येई टाळता ।

उद्योग चिंता घालावी , एवढे लक्षात ठेवा ।।

विश्वास ठेवावाच लागे , व्यवहार चाले त्यावरी ।

सीमा तयाला पाहजे , एवढे लक्षात ठेवा ।।

दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले ।

तोच गुरुचे पांग फेडी, एवढे लक्षात ठेवा ।।

माणसाला शोभणारे , युद्ध एकच या जागी ।

त्याने स्वतःला जिंकले , एवढे लक्षात ठेवा ।।



 

Comments

Popular posts from this blog

कवी सुरेश भट यांची " विझलो आज जरी मी " हि कविता || poet Suresh Bhat's " wizalo aaj jari mi " poem

कवी विंदा करंदीकर यांची "आयुष्याला द्यावे उत्तर" हि कविता || poet Vinda Karandikar's "Aaushyala dyave uttar " poem

त्याला तयारी पाहिजे || कवी विंदा करंदीकर || Tyala Tayari Pahije poem by poet Vinda Karandikar