कवी विंदा करंदीकर यांची "आयुष्याला द्यावे उत्तर" हि कविता || poet Vinda Karandikar's "Aaushyala dyave uttar " poem
कवी गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर यांची "आयुष्याला द्यावे उत्तर" हि कविता खूप काही शिकवून जाते. हि कविता आयुष्यातील संकटांशी लढण्याचे बळ देते, तसेच स्वप्न पाहायला शिकवते असे बरेचशे उद्देश विंदा करंदीकरांनी या कवितेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
कवी विंदा करंदीकर |
" असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावुन अत्तर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर...
नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची,
आयुष्याला भिडतानाही, चैन करावी स्वप्नांची...
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर.

पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना,
हसू असावे ओठांवरती, काळीज काढुन देताना...
संकटासही ठणकावुन सांगावे, आता ये बेहत्तर,

करून जावे असेही काही, दुनियेतुनी या जाताना,
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटचा देताना...
स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर,
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर..."

"" कविता आवडली असेल तर इतरांना पण पाठवा ... धन्यवाद ! ""
Comments
Post a Comment