Posts

Showing posts from June, 2020

कवी सुरेश भट यांची " विझलो आज जरी मी " हि कविता || poet Suresh Bhat's " wizalo aaj jari mi " poem

Image
प्रत्येकजण आपल्या आयुष्यात निराश किंवा अपयशी कधीना कधी होतो. कोणी परत त्या निराशेतुन किंवा अपयशातून बाहेर पडून परत नव्याने लढाई सुरू करण्याचे सामर्थ्य ठेवतो. तर कुणी हार मानून प्रयन्त सोडून देतो. कोणी अगदी टोकाचा निर्णय घेऊन स्वतःचे आयुष्य संपवतो. परंतु जो स्वतःशी सकारात्मक बोलवतो तो जीवनातल्या कोणत्याही संकटाशी सामना करण्यासाठी परत सज्ज होतो. अशीच स्वतःला बळ देणारी, संकटावर मात करण्याचे सामर्थ्य देणारी कवी सुरेश भट यांची विझलो आज जरी मी हि कविता. " विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही... पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही... छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही... माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे... जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही... रोखण्यास वाट माझी, वादळे होती आतूर... डोळ्यांत जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही... येतील वादळे, खेटेल तुफान तरी वाट चालतो... अडथळ्यांना भिवून अडखळणे, पावलांना पसंत नाही... " "" कविता आवडली असल्यास इतराना पण पाठवा...     धन्यवाद ! ""

जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाची मनोरंजक माहिती || Interesting information about largest bird on earth

Image
आपल्या सर्वांना माहित असेल कि जगातला सर्वात मोठा पक्षी म्हणून शहामृग या पक्षाला ओळखले जाते. खरेतर जगात शहामृगा पेक्षाही मोठे पक्षी होते परंतु कालांतराने ते नष्ठ झाले. हा जगातला सर्वात मोठा पक्षी आहेच परंतु या पक्षाच्या आणखीन काही मजेशीर माहिती तुम्हाला माहित असायला पाहिजे. १. शहामृग हा जगातला सर्वात वजनदार आणि सर्वात मोठा पक्षी आहे, त्याची उंची ९ फूट पर्यंत आणि वजन १४५ किलोग्रॅम पर्यंत असते. २. शहामृगाचे डोळे हे त्याच्या मेंदूपेक्षाही मोठे असतात आणि त्याचे डोळे हे जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांपेक्षा सर्वात मोठे आहेत. ते सुमारे ५ सेंटीमीटर असते. ३. शहामृग हा पृथ्वीवरील सर्वात मोठे अंडे देणारा पक्षी आहेत. ते १५ सेंटीमीटर लांब आणि १.५ किलो वजनाचे असते. ४. शहामृग हा पक्षी असून तो त्याच्या पंखाने उडू शकत नाही, परंतु तो त्याच्या दोन पायाने ७० किलोमीटर प्रति तास वेगाने पळू शकतो. शहामृगाचे पंख उडण्यासाठी नसून जमिनीवर पाळताना दिशा बदलण्यासाठी तो वापरतो. ५. सहामृगाला ३ पोट असतात. ६. शहामृग त्याचे अन्न बारीक करण्यासाठी तो गारगोटी आणि छोटे दगड खातो आणि त्याच्या मदतीने तो पोटातील अन्न बारीक करतो. ...