त्याला तयारी पाहिजे || कवी विंदा करंदीकर || Tyala Tayari Pahije poem by poet Vinda Karandikar
आपण नेहमी ऐकत आलो आहोत कि सत्य हे नेहमी कडू लागत. परंतु ते मधातून देण्याची कला, मात्र फार थोड्या लोकांकडे असते. याची प्रचिती तुम्हाला कवी विंदा करंदीकर यांची " त्याला तयारी पाहिजे " हि कविता एकूण नक्की येईल. " अग्नीमुळे प्रगती घडे, हे अन्नही त्याने शिजे. चटका बसे केंव्हातरी, त्याला तयारी पाहिजे. पुष्पे, फळे नि सावली, वृक्षातळी या गावली. काटा अभावीत बोचता, त्याला तयारी पाहिजे. आपुल्या चुका ना आपणा, इतरांस त्या दिसती परी. त्याचीच चर्च्या व्हायची, त्याला तयारी पाहिजे. केले कुणास्तव ते किती, हे कधी मोजूनये, होणार त्याची विस्मृती, त्याला तयारी पाहिजे. डोक्यावरी जे घेऊनी, आज येथे नाचती. घेतील ते पायातळी, त्याला तयारी पाहिजे. सत्यास साक्षी ठेवुनी, वागेल जो, बोलेल जो, तो बोचतो मित्रांसही , त्याला तयारी पाहिजे. पाण्यामध्ये पडलास ना ? पाणी कसेही ते असो. आता टळेना पोहणे, त्याला तयारी पाहिजे . सुखात सर्व सोबती, दुःखात ना कोणती. समोर जाण्या एकटा, त्याला तयारी पाहिजे. तोंडावर गोड जे बोलती, पाठीमागे निंदा करिती. तोंड देण्या निंदकास, त्याला तयारी पाहिजे. ...