आपल्या सर्वांना माहित आहे कि प्रत्येक सन साजरा करण्यामागचे काहीना काही कारण नक्कीच असते. तसेच होळी साजरी करण्यामागचे पण आहे, जे तुमच्या पैकी बऱ्याच जणांना माहित असेल जर माहित नसेल तर नक्की जाणूनघ्या. भागवत पुराणामध्ये सांगितल्या प्रमाणे खूप वर्षांपूर्वी हिरण्यकशप नावाचा राजा होता. त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून असे वरदान मागितले कि " माझा मृत्यू ना जमीनवर ना आकाशात ना पाताळात झाला पाहिजे ,ना मानवाद्वारे ना दानवाद्वारे ना कोणत्या प्राण्यांद्वार झाला पाहिजे आणि नाही घरात आणि नाही दारात ". असे वरदान ब्रह्मदेवाला माघीतले आणि ब्रह्मदेवाने त्याला दिले . परंतु त्या वरदानाला अमृत्व समजून अहंकाराने, क्रूर बुद्धीने तो राज्य करूलागला. स्वतःला देव समजू लागला आणि रयतेने त्याला देवासारखे समजून त्याचीच पूजा करावी अशी सक्ती करूलागला. परंतु त्याचाच मुलगा भक्त प्रल्हाद मात्र भगवान विष्णू ची मनोभावे पूजा करायचा. हे मात्र हिरण्यकशप ला सहन होत नव्हते. त्याने स्वःताच्या मुलाला खूपदा मारण्याचे प्रयन्त केले परंतु ते भगवान विष्णूने सफल होऊ दिले नाही. शेवटी हिरण्यकशप ने त्याची ब...