Posts

Showing posts from February, 2020

आपल्याला डसणारा डास हा नर असतो कि मादी ?

Image
आपल्याला डसणारा डास हा नर असतो कि मादी ?😮 आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला बऱ्याचदा डास डसतात, परंतू आपण कधी विचार केला आहेका कि आपल्याला डसणारा डास हा नर असतो कि मादी ! डास हा जगातला सर्वात जास्त जीव घेणाऱ्या प्राण्यांन मध्ये मोडला जातो. जगात सर्वात जास्त लोक हे डासा मुळे होणाऱ्या रोगांमुळे मरण पवतात.  खरे पाहता तर डासांचे अन्न हे वनस्पती आणि फळांचा रस आहे.  परंतु ते आपल्याला का डसतात आणि आपल्याला डसणारा डास हा नर आणि मादी दोन्ही नसून फक्त मादी असतो. त्याच कारण आहे कि मादी डासाला त्याच्या पोटात अंडे बनवन्यासाठी आणि वाढविण्यासाठी अर्थात प्रजनना साठी जास्त प्रोटिनची आवशक्ता असते ती वनस्पतीच्या आणि फळांच्या रसातून पूर्ण होत नाही त्यामुळे मादी दासाला इतर प्राण्यांचे रक्त पिवुन त्याची पूर्तता करावी लागते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाईझशन च्या रिपोर्ट नुसार दर वर्षी लाखो लोक डासांमुळे होणाऱ्या आजाराने मरण पावतात. त्यामुळे डासांना घाबरा त्यांना डसू देऊ नका.  आणि हो आइसलँड हा असा एकमेव देश आहे जिथे एकपण दास नाही.  माहिती आवडली असेल तर इतरांना पण पाठवा...